Tuesday, October 28, 2014

खारट.

समुद्राचं पाणी…क्षणात पुढं येतं , रुक्ष किनाऱ्याला ओलावा देतं , लाटांच संगीत ऐकवतं , कधी शंख-शिंपले देतं  तर कधी मोती… आपलसं होतं …. भरतीनंतर ओहोटी येणार  हे मात्र आपण विसरूनच जातो जणू… पायाखालची वाळू सरकते तेव्हाच भानावर यायला होतं!
ओहोटीच्या समुद्रकिनारी उभा आहे मी,  अगदी पायाशी खेळणारं पाणी..  दूर चाललंय आणि मी मात्र घट्ट मनाने दूर  जाणाऱ्या पाण्याकडे शांतपणे बघण्यावाचून काहीच करू शकत नाही .. अगदी क्षितिजापर्यंत.