चहा !
चहा! चाय ! चाया ! टी ! कटिंग! स्पेशल ! ही सर्व शब्दावळ एकाच भावनेशी जुळलेली आहे, चहा हे पेय नसून तो एक आनंद आहे, उत्साह आहे, सखा आहे सोयरा आहे. चहा पोटात नव्हे तर मनात जातो. तो नेहमीच मनाशी जुळलेला असतो, लहानपणी दुधात रंग येण्यापुरता चहा टाकून द्यायची आई, तेव्हापासून हा आवडता.
चहा हा कधीच सारखा नसतो. दररोजचा चहा हा काहीतरी विषेश असतो, अगदी आयुष्यभर ! आईने बनवलेला चहा, स्वतः बनवलेला चहा, काळा चहा - गोरा चहा, कमी साखरेचा चहा - खडी चम्मच चहा, ष्ट्रोंग चहा - फिका चहा, आल्याचा चहा - इलायची चहा, सकाळचा चहा - दुपारचा चहा, घरातला चहा - ऑफिसातला चहा- टपरीवरचा चहा - कॉलेग कॅन्टीन चा चहा, मित्रांबारोबारचा चहा - मैत्रिणी बरोबरचा चहा, बिस्कीटा बरोबरच चहा - सिगारेट बरोबरचा चहा, पावसातला भजी बरोबरचा चहा - थकून उन्हात उभारत घेतलेला चहा, टेबल वर बसून घेतलेला चहा - बाल्कनीत उभारून पिलेला चहा, शांतपणे पिलेला चहा- फुरक्या मारत पिलेला चहा, वेळ जात नसतानाचा चहा - परीक्षेआधी रात्री पिलेला चहा, कादंबरी वाचतानाचा चहा - अभ्यासाबरोबरच चहा, एव्हाना स्वतः पिलेला चहा - कुणीतरी पाजलेला चहा, पावडर वाला चहा किंवा गवती चहा, असे असंख्य प्रकारचे चहा आपण आपल्या आयुष्यात अनुभवतो. एवढं मात्र खरं , चहा नेहमी 'हाय-टी'च असतो , तो 'लो' कधीच नसतो.
चहा भारतात कसा आला, कुठून आला याच्या बद्दल फारसं मला माहित नाही पण , ब्रिटीशांच राज्य भारतावर होतं ते निव्वळ चहा मुळेच असं माझं ठाम मत आहे! बाकी मसाले वगेरे हा सर्व 'मसालाच' ! चहाचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व फार मोठं आहे, चहाचे मळे असलेली भारतातली बरीचशी थंड हवेची ठिकाणी मी पालथी पडलेली आहेत आणि उरलेली माझ्या यादीवर आहेत. त्यांचं वैशिष्ट्य हे पण चहा सारखंच वेगळं आहे. गरिबांचे मळे, सरकारी मळे, राजकारण्यांचे मळे, उद्योजकांचे मळे - पण चहामध्ये या सगळ्यांची चव कधीच उतरत नाही, चहा हा सर्व मळ्यामधून सारखाच बाहेर येतो. सर्वाना सुखावणारा, त्राण कमी करणारा, जवळीक वाढवणारा, तरतरी आणणारा. गरीबाच्या झोपडीतला चहा, छोटू चा चहा, पंचतारांकित हॉटेलातला चहा किंवा मध्यम वर्गीयांच्या घरातला चहा सगळे तितकेच 'स्पेशल'! दूध आणि उकळलेल पाणी मिसळून बनवलेला चहा किंवा सर्व एकत्र टाकून उकळलेला चहा, साखर आधीच टाकलेला चहा किंवा नंतर आवडीप्रमाणे साखर टाकलेला चहा, गुळाचा चहा किंवा मधुमेह वाल्या लोकांचा खोटी साखर टाकलेला चहा - सगळे तितकेच 'गोड' असतात.
चहा हा एक असा मित्र आहे कि जो आबाल्वृद्धाना बांधून ठेवतो, कॉलेग कट्ट्यावरचा मित्रांचा ग्रुप असो, किंवा ऑफिसात सिगारेट आणि चहासाठी भेटणारा गट असो किंवा मॉर्निंग वॉक नंतर भेटणारा म्हातार्या कोतारयांचा ग्रुप असो, सगळ्यांना तितक्याच ताकदीने एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चहा. चहा ची किंमत ही कधीच पैशात मोजता येणार नाही, कारण चहा वरच्या चर्चा, गप्पा, टीम मीटिंग, वाद-विवाद, प्रेम हे सगळं खूपच अनमोल आहे. अश्या या चहा-प्रिय भारतात पंतप्रधानही एक चहा वालाच झाला यात काहीच नवल नव्हे!